अधुनीक मल्लयुध्द, किकबॉक्सिंग


                                                            1
अधुनीक मल्लयुध्द, किकबॉक्सिंग
     प्राचिन काळापासुन मल्लयुध्दाला अतिशय महत्व आहे. हल्ली तर स्वयंरक्षणासाठी एखादी मार्शल आर्ट अवगत असणे ही काळाची गरज बनली आहे. जगात कराटे, ज्युदो, बॉक्सिंग, तायक्वांदो, वुशू इ. सारख्या विविध स्वरक्षणकला विकसीत झाल्या आहेत. या सर्व मार्शल आर्टला क्रीडेचा दर्जा देवून गुणात्मक विकास साधला जात आहे. बॉक्सिंगचा ठोसा, तथा रिंगची भीती दुर करण्याच्या दृष्टीने कराटे आणि बॉक्सिंग यांचे मिश्रण करून नविन मार्शलआर्टचा प्रकार विकसीत करण्यात आला त्यास “किकबॉक्सिंग” असे म्हणतात. हया अत्याधुनिक बॉक्सिंगचा शोध 1960 च्या दशकात जपान मध्ये लागला. 1997 मध्ये अमेरिकेत किकबॉक्सिंगवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. किकबॉक्सिंगला व्यवसायिकतेचे खरे रुप अमेरिकेत प्राप्त झाले. कोट्यावधी रूपयांच्या  रोख पारितोषिकांमुळे किकबॉक्सिंग जागतिकस्तरावर लोकप्रिय झाला. 2005 च्या … ऑलिंम्पिकमध्ये ह्या खेळाचा समावेश करण्यात आला. किकबॉक्सिंग हा खेळ इनडोअर असून, तो दोन प्रतिस्पर्धामध्ये गुणांकन पध्दतीत खेळवला जातो. हातात बॉक्सिंगचे ग्लोव्हज् आणि पायात मऊ हलके बुट वापरण्यात येतात.
खेळाचे सर्वसाधारण नियम : काही अपवादात्मक फरक वगळता जपान आणि अमेरिकेच्या किकबॉक्सिंगचे नियम सारखेच आहेत. खेळाडूंना दातासाठी सुरक्षाकवच, हाताचा पट्टा, गंडघ्याचा पट्टा, हेल्मेट इ वापरता येते. प्रतिस्पर्धाच्या एकमेकांच्या कंबरेच्यावर लाथा आणि पंचेस मारण्याची मुभा असते. गडघ्याचा आणि कोपराचा वापर पंचेस म्हणून करता येत नाही. राष्ट्रीय तथा अंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 3 ते 5 फेऱ्या घेतल्या जातात. प्रत्येक 2 मिनिटांच्या फेऱ्यामध्ये 1 मिनिटाची विश्रांती असते. जिल्हा क्रीडा  विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय
किकबॉक्सिंग स्पर्धामध्ये 19 वर्ष आतील मुला, मुलींच्या वजनगटानुसार स्पर्धा संपन्न होतात. ह्यात मुलांच्या 44, 48, 52, 56, 60, 65, 70, 75, 80 व 85 किलो वरील वजन गट, तर मुलीच्या गटात 45, 48, 51, 54, 57, 63 व 63                             
                                                                 2
किलो वरील वजन गटाच्या स्पर्धा घेतल्या जातात. राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय खेळांडूनी उज्वल कामगीरी केली आहे. 150 च्या वर खेळाडूनी भारताचे प्रतिनिधीत्व करत पदके प्राप्त केली आहेत. मकाऊ येथील एशियन इनडोअर गेम मध्ये भारताने एकुन 13 पदकाची कमाई केली, ह्यात महाराष्ट्राच्या नावे 8 पदके आहेत. 2003 साली मस्कत ओमान येथे झालेल्या किकबॉक्सिंग स्पर्ध्येत पुण्याच्या बापु घुले ह्या खेळाडूने 75 किलो वजन गटात पहिले सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 2001 ते 2011 सलग 11 वर्षे राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या संघाने र्निविवाद वचर्स्व स्थापन करत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 2007, 2009 व 2013 रोजी संपन्न झालेल्या एशियन इनडोअर गेम मध्ये एकुण 18 पदके प्राप्त केली आहेत. महाराष्ट्रात राज्यभर 33 जिल्हा संघटना कार्यरत असुन किकबॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार वेगात चालू आहे. भारतीय राष्ट्रीय किकबॉक्सिंग महासंघ ( वाको ) आणि महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोशिएशन यांच्या माध्यमातुन ए. तांबोळी यांच्या नेत्रत्वात वाटचाल सुरु आहे.
पदक विजेते खेळाडू :- आशियाई स्पर्धा, सतीश राजहंस, संजय कटोडो, उमर तांबोळी ( सर्व पुणे ). राष्ट्रीय विजेते, चार वेळेसचा विजेता अतुल घुले (पुणे), करण व्यास उमेश तळेगावकर ( लोणावळा ), करण व्यास  ( रत्नागीरी )
     किकबॉक्सिंग ह्या खेळात महाराष्ट्राची वाटचाल सुखकर आहे, प्रतिभावान खेळाडूंना शुभेच्छा देवूया…..
शंकर शहाणे
क्रीडा शिक्षक
सरस्वती धन्वंतरी मा शाळा, नांदखेडा.

Comments

Popular posts from this blog

100 मीटरची जलदगतीची धाव

जलक्रीडा.. वाटरपोलो

साउथ एशियन गेम्स