माँटेक्सबॉल क्रिकेट
क्रिकेटचा पर्यायी खेळ, माँटेक्सबॉल क्रिकेट.. क्रिकेटचा आनंद सर्वानाच घ्यावसा वाटतो पण ग्रामिणभागातील अर्थकारणामुळे लेदरबॉल क्रिकेट सर्वस्तरापर्यत पोहचू शकत नाही. पर्याय म्हणुन रबरी किंवा टेनिस बॉलने क्रिकेटचा आनंद ग्रामिंण भागातील तरूण घेतांना अढळून येतात. अशाच रबरी बॉलच्या सरावातुन माँटेक्सबॉल क्रिकेटचा उगम झाला. इतिहास : क्रिकेटला पर्यायी खेळ म्हणून मॉटेक्सबॉल क्रिकेटची सुरूवात महाराष्ट्रातील गोंदीया येथील संघटक श्री ढोलीचंद मेश्राम महासचिव मॉटेक्सबॉल असोशीएशन ऑफ महाराष्ट्र यांनी केली. मराठवाड्यात, परभणीच्या हुसैनखॉ पठाण यांच्या नेत्रत्वात सर्व जिल्हात मॉटेक्सबॉलचा प्रचार होत आहे. मॉटेक्सबॉलच्या पाच राष्ट्रीय स्पर्धामध्ये परभणीने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. महाराष्ट्रासह, देशाच्या इतर राज्यातही हया खेळाचा प्रचार व प्रसाराने वेग धरला आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, भुतान, बॅकॉक, श्रीलंका इत्यादी देशात मॉटेक्सबॉल लोकप्रिय आहे. खेळाचे मैदान पिच : आयाताकृती असणाऱ्या ह्या मैदानाची लांबी 18 ते 20 मीटर आणि 2.69 मीटर रुंद असते. बॉलींग / बॉटिग क...