जलक्रीडा.. वाटरपोलो
जलक्रीडा.. वाटरपोलो
पुरातन काळात जलक्रीडेचा उल्लेख बऱ्याचदा आढळून येतो. वाटरपोलोला अधुनिक काळातील जलक्रीडा म्हणता येईल. जलतरण तलावत हॅन्डबॉल खेळातील गोलपोस्ट सारखे गोलपास्ट पावरून वाटरपोले खेळ खेळला जातो. बचाव आणि आक्रमक ह्या कौशल्यामुळे पाण्यातील ह्या क्रीडेची आवड वाढूलागल्याचे आढळून येते.
इतिहास : वाटरपोलो ह्या खेळाची सुरूवात 19 व्या शतकात स्कॉटलॅड मध्ये झाली. पुर्वी ह्या खेळाचे नामकरण वाटर रग्बी असे होते. स्कॉटलॅड येथील विलीयम विलसन यांनी नदी आणि तळ्यांमधुन हा खेळ विकसीत केलाचा उल्लेख अढळून येतो. इंग्लडमध्ये अक्वॉटीक फुटबॉल नावानेही वाटरपोलो खेळला जात असे. येथील सेंन्ट लॉरेन्स नदीत इ.स. 1887 मध्ये वाटरपोलोचे सामने खेळल्या खेल्याचा उल्लेख आढळतो. स्कॉटलॅड विरूध्द इंग्लड हा आंतरराष्ट्रीय सामना इ.स. 1890 मध्ये खेळला गेला. पॅरीस सेथील इ.स. 1900 च्या ऑलिम्पिक मधुन पुरूषांचया वाटरपोलो स्पर्धाचा समावेश करण्यात आला. इ.स. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिक मधुन महिलांसाठी हा खेळ सुरु करण्यात आला. इंटरनॅश्नल वल्डपोला कमेटीची स्थापना इ.स. 1929 साली झाली. यातुनच पुढे FINA आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाची स्थापणा झाली. युरोपसह जगभरातील विविध राष्ट्रामध्ये वाटरपोला लोकप्रिय क्रीडाप्रकार झाला. ह्यात स्कॉटलॅल, इंग्लड शिवाय हंगेरी, सर्बीया, क्रोशीया, रशिया, ग्रीस, चायना, कॅनडा, ऑस्टेलीया, नॅदरलॅन्ड, इटली, स्पेन इत्यादी राष्ट्रांचा समावेश होतो. जागतीक आणि ऑलिम्पिक स्पर्धामध्ये युरोपीयन संघाचे नेहमीच वर्चस्व आढळून येते.
खेळाडू : वाटरपोले हा सांघिक क्रीडाप्रकार आहे संघात एकुण 12 खेळाडू असतात. प्रत्यक्ष खेळात सात खेळाडू सहभागी होतात, त्यात एक गोलकीपर असतो. खेळांडूच्या पाण्यातील स्थितीवरून खेळाडूच्या जागा निश्चीत होतात, ह्या सेंटर फॉरवर्ड, सेंटर बॅक, विंग अट्याकर इत्यादी.
जलतरण तलाव : आंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव हा FINA च्या मानांकनानुसार ठरलेल्या मापात तयार करण्यात आलेला असतो. तलाव हा 20*10 मीटर अथवा 30*20 मीटर येवढा मापाचा असतो. पाण्याची खोली ही 1.8 मीटर असते. तलावाची मधोमध रेषा ही पांढऱ्या रंगात आखलेली असते. गोलपोस्टच्या पुढे 2 मीटर अंतरावर लालरंगात, तर 5 मीटर पुढे पिवळ्या रंगात रेषा दोन्ही गोलपोस्ट समोर आखलेल्या असतात.
बॉल : सर्वसाधारणपणे पिवळ्या रंगाचे बॉल हे स्पर्ध्येसाठी वापरले जातात. पुरूषांच्या सामन्यासाठी ह्या बॉलचा व्यास हा 28 इंच आणि महिलासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉलचा व्यास हा 26.5 इंच एवढा असतो. बॉलचे वजन 14 ते 16 औन्स असते. बॉल हा तळहातात बसणारा असुन त्यास ग्रीप असते.
गोलपोस्ट : तलावाच्या दोन्ही बाजूला मधोमध गोलापोस्ट तरंगते लावलेले असतात. गोलपोस्टची पाण्यावरील उंची ही 3 मीटर असून रुंदी ही 90 सेमी. एवढी असते. गोलपोस्टला पाठीमागे जाळी बसवलेली असते.
टोपी : प्रत्येक खेळाडूला टोपी वापरावी लागते टोवीवर 1 ते 15 पर्यतचे ठळक क्रमांक टाकलेले असतात.
सामन्याचा कालावधी : आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 9 मीनीटाचे चार हाफ खेळवले जातात. सर्वाधीक गोल करणाऱ्या संघास विजयी घोषीत केले जाते.
वाटरपोलो ह्या क्रीडाप्रकारात भारतीय महिला संघ हा इ.स. 2010 च्या एशियन मध्ये चौथ्या क्रमांकावर राहीला होता. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये महिला व पुरुष संघानी पदकाची कमायी केली होती. बेंगलोर येथील राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या कनिष्ठ मुलांच्या संघाने सुवर्ण पदकाची कमायी केली होती.
राष्ट्रीय आंतराष्ट्रीय खेळाडू : बिजॉय बर्मन, इसाक मंन्सुर, सचिन नाग, गोरा सील, खालीललाल शाह इत्यादी आंतरराष्ट्रीय प्रतिभावान खेळाडू आहेत. महाराष्ट्रातील कुमार संघात रायगडच्या अक्षय व अश्विन कुंड, ओंकार कासार, निखील शिंदे, योगेश व महेश कुटे, श्रेयश वैद्य आणि पुण्याच्या अदैत्य पंडीत यांचा समावेश होतो.
जलक्रीडेत भारतीय खेळांडूचा इतिहास हा प्रभावशाली नसला तरी येणारी युवा पुढी वाटरपोलो क्रीडाप्रकारात भारताला गौरवशाली बनवील यात शंका नाही. आपण मात्र उन्हापासून वाचण्यात जलक्रीडेचा आनंद घेवू…
शंकर शहाणे
क्रीडाशिक्षक / संघटक
सरस्वती धन्वंतरी मा. शाळा, नांदखेडा
मो. 9421387144

Comments
Post a Comment