Posts

माँटेक्सबॉल क्रिकेट

क्रिकेटचा पर्यायी खेळ, माँटेक्सबॉल क्रिकेट..      क्रिकेटचा आनंद सर्वानाच घ्यावसा वाटतो पण ग्रामिणभागातील अर्थकारणामुळे लेदरबॉल क्रिकेट सर्वस्तरापर्यत पोहचू शकत नाही. पर्याय म्हणुन रबरी किंवा टेनिस बॉलने क्रिकेटचा आनंद ग्रामिंण भागातील तरूण घेतांना अढळून येतात. अशाच रबरी बॉलच्या सरावातुन माँटेक्सबॉल क्रिकेटचा उगम झाला. इतिहास : क्रिकेटला पर्यायी खेळ म्हणून मॉटेक्सबॉल क्रिकेटची   सुरूवात महाराष्ट्रातील गोंदीया येथील संघटक श्री ढोलीचंद मेश्राम महासचिव मॉटेक्सबॉल असोशीएशन ऑफ महाराष्ट्र यांनी केली. मराठवाड्यात, परभणीच्या हुसैनखॉ पठाण यांच्या नेत्रत्वात सर्व जिल्हात मॉटेक्सबॉलचा प्रचार होत आहे. मॉटेक्सबॉलच्या पाच राष्ट्रीय स्पर्धामध्ये परभणीने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. महाराष्ट्रासह, देशाच्या इतर राज्यातही हया खेळाचा प्रचार व प्रसाराने वेग धरला आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, भुतान, बॅकॉक, श्रीलंका इत्यादी देशात मॉटेक्सबॉल लोकप्रिय आहे. खेळाचे मैदान पिच : आयाताकृती असणाऱ्या ह्या मैदानाची लांबी 18 ते 20 मीटर आणि 2.69 मीटर रुंद असते. बॉलींग / बॉटिग क...

साउथ एशियन गेम्स

साउथ   ए शि य न  गेम्स               दक्षिण आशियाई देशांमध्ये सलोखा व सामंजस्य वाढावे . या देशातील लोकांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एकत्र येऊन वैचारीक व सांस्कृतिक देवाणघेवाण करावी . क्रीडाक्षेत्रातील लोकांनी एकमेकांच्या शारीरिक कौशल्ये आत्मसात करावीत ह्या हेतुने दक्षिण आशियाई स्पर्धांचे आयोजन करण्यात येते . धडाक्यात पारपडलेल्या सॅग ( साउथ ए शि य न गेम्स ) स्पर्धामधुन भारतीय खेळांडूनी केलेली कामगीरी नक्कीच कौतुकास्पद अशी आहे . संपूर्ण दक्षिण आशियात आपले क्रीडावचर्स्व खेळांडूनी निर्माण केले आहे . आसामची राजधानी गोवाहाटी आणि मेघालयाची राजधानी शिलाँग येथे 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा पारपडल्या . ब्रम्हपुत्रेच्या काठावर वसलेल्या ह्या शहरांमध्ये 5 फेब्रु . रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले . भारतासह पाकिस्तान , नेपाळ , श्रीलंका , बांगला देश , भूतान , अफगानिस्तान आणि मालदिव ही राष्टे स्पर्ध्येत सहभागी झाली होती . के...