100 मीटरची जलदगतीची धाव
100 मीटरची जलदगतीची धाव विविध क्षेत्रात भरतीची प्रकीया सुरू होताच मैदाने गजबजु लागतात. येरवी तुरळीक जाणवणारी गर्दी आता यात्रेची स्वरूप घेवू लागते. वेळीच युवावर्गाला जाग येतेय ही आपली जेमेची बाजू आहे. चालणे, धावणे, उड्याघेणे, गोळाफीची क्रीयाकरणे तसेच शरीराच्या विविध हालचाली करतअसतांना युवा ब्रिगेड दिसते. भविष्यामुळेचका होईना आपल्या सुदृढ शरीराची जाणिवझाली ही आनंदाची बाब आहे. भरतीसाठी निर्णायक ठरणारी जलद गतीची धाव घेतांना घ्यावयाची काळजी तथा त्यासाठीचे पुरक व्यायाम हे ही तेवढेच महत्वाचे आहेत. जलद धाव पुर्ण करण्यासाठी लागते, पायात स्फोटक शक्ती आणि हृदयाचा दमखमपणा. ज्याला आपली आपेक्षित ह्दगती (THR) समजला तो विनाअपघात उत्तमप्रकारे धावण्याचा सराव करू शकेल. सर्वसाधारणपणे आपल्या ह्दयाची गती ही कमाल गतीच्य...