ध्यानचंदांचे आले ध्यान..
ध्यानचंदांचे आले ध्यान .. आपण सर्व भारतवासी तेवीसाव्या क्रीडादिनाला सामारो जात आहोत. पर्यावरणदिन, बालदिन, योगदिन, क्रीडादिन.... फक्त साजरे करून आपण मोकळे होतो. एका दिवसाच्या ह्या उत्साहामध्ये आपण आनंद शोधत असतो. त्या दिवसा पुरता तो आपल्याला मिळतोही. पण पुढे काय ? तीचती सुरुवात. आपल्यापैकी काही संकल्पही करतात, आणि असे संकल्प विरघळतांनाही आपण पाहातो. आपणाला खरी आठ वण येते अडचणीच्या वेळी आळस, कंटाळवाणेपण, आणि आजर अशा वेळी आपण क्रीडा, खेळ आणि योग यांचे गुणगान गात आसतो. क्रीडादिनावरून आठवण होते ती “ मेजर ध्यानचंदाची. ” मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस आपण क्रीडदिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद आपल्या खरेच लक्षात राहीले आहेत काय ? जर असतील तर त्यांचा भारतरत्नाचा आग्रह मोजकेच क्रीडाप्रेमी धरतांना का दिसतात ? गेल्या वर्षी कुमार गटाच्या भारतीय युवा हॉकीपट्टूनी तब्बल पंधरा वर्षा नंतर विजयी चषक उंचावला . भारत हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदांचा देश आहे हे जगाला आठवुन दिले . ध्यानचंदांच्या नावावर हॉकीतील अनेक पराक्रम तर आहेतच शिवाय...