साउथ एशियन गेम्स
साउथ एशियन गेम्स दक्षिण आशियाई देशांमध्ये सलोखा व सामंजस्य वाढावे. या देशातील लोकांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एकत्र येऊन वैचारीक व सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. क्रीडाक्षेत्रातील लोकांनी एकमेकांच्या शारीरिक कौशल्ये आत्मसात करावीत ह्या हेतुने दक्षिण आशियाई स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. धडाक्यात पारपडलेल्या सॅग ( साउथ एशियन गेम्स ) स्पर्धामधुन भारतीय खेळांडूनी केलेली कामगीरी नक्कीच कौतुकास्पद अशी आहे. संपूर्ण दक्षिण आशियात आपले क्रीडावचर्स्व खेळांडूनी निर्माण केले आहे. आसामची राजधानी गोवाहाटी आणि मेघालयाची राजधानी शिलाँग येथे 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा पारपडल्या. ब्रम्हपुत्रेच्या काठावर वसलेल्या ह्या शहरांमध्ये 5 फेब्रु. रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगला देश, भूतान, अफगानिस्तान आणि मालदिव ही राष्टे स्पर्ध्येत सहभागी झाली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल हे पूर्वाचलचेच असल्याने त्यांचे नेत्रत्व आयोजनाला लाभले. भारतीय खेळांडूनी विविध विक्रमांची नोंद ह्या स्पर्धामधून केली. जलतरणात 28 तर मैदानीस्पर्धामध्ये डझनावर विक्रम नोंदवीले गेल. रिओ ऑलिंम्पिकची रंगीततालीम असे ह्या स्पर्ध्येस संबोधीता येईल.
दक्षिण आशियाई आठ देशातील तब्बल 2 हजार 672 खेळांडूनी ह्या स्पध्येत सहभाग घेतला. 22 विविध क्रीडाप्रकारातील ही स्पर्धा सलग 12
दिवस चालली. पहिल्याच दिवसापासून भारतीय खेळांडूनी चमकदार कामगीरी बजावली. 188 सुवर्ण पदकासह भारताने एकुन 308 पदके विविध क्रीडाप्रकारात प्राप्त केली. त्यामध्ये 90
रौप्य आणि 30
कास्य पदकांचा समावेश आहे. पदकतालीकेत द्वितीय स्थानावर असणाऱ्या श्रीलंकेने 25 सवर्ण, 63
रौप्य आणि 98 कास्य पदकासह 188
पदकाची कमायी केली. भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान मात्र 12 सवर्ण 37 रौप्य आणि 57 कास्य एकुण 106 पदके घेवून तृतिय स्थानी राहीला. मागील 30 वर्षातील ही भारतीय खेळांडूची उच्चतमम कामगीरी आहे.
भारतीय मातीतील खेळ कबड्डी, खो-खो सह बॉक्सिंग, तिरंदाजी, टेनिस, शुटिंग, ॲथलेटिक्स, कुस्ती, जलतरण, वजन उचलणे, सायकलिंग, ज्युडो, वुशू इत्यादी क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूनी अव्वल कामगीरी केली. तायकांदो ह्या क्रीडाप्रकारात भारताला अफगाणिस्तानाकडून मात खात रौप्य पदकवर समाधान मानावे लागले. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीत परत एकदा प्रतिद्वदी पाकिस्तानने सुवर्ण परकापासून रोखले. कुस्ती ह्या क्रीडाप्रकारात महिलांनी 8 तर, पुरूषांनी 6 सुवर्ण पदकाची कमाई केली. बॉक्सिंग मध्ये पुरूषांनी आप-आपल्या गटातील सातही सुवर्णपदके जिंकली. देवेंद्रो सिंग, मदन लाल, शिवा थापा, विकास कृष्णण, अहमद अली, मनदीप जांगडा यांचे पंचेस प्रभावी ठरले. महिला
2
बॉक्सरनी तीन सुवर्ण परकांची कमायी केली. ह्यात मेरी कोम, पूजा राणी आणि एल. सरिता यांचा समावेश आहे. ज्यूदो क्रीडाप्रकारात भारताने 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकाची कमाई केली. पुरूषाच 90 किलो वजनी गटात अवतारसिंगने अफगानिस्तनच महमंद ककर याचा 49
सेकंदात पराभव केला. महिलांच्या 70 किलो वजनी गटात पुजाला पाकिस्तानच्या बीनिश खान हिचा कडवा प्रतिकार करावा लागला. तिने हि स्पर्धा
3.03 मिनीटात जिंकुन सुवर्ण पदक प्राप्त केले. 78 किला वजन गटात पाकिस्तानच्या फौजिया मुमताजने सुवर्ण तर भारताच्या अरूणाने रौप्य पदक प्राप्त केले.
10 मीटर एअर पिस्तूल स्पर्ध्येत हीना सिध्दूला रौप्यपदकवर समाधान मानवे लागले. स्वेता, हिना आणि यशस्विनी सिंगने भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. पुरुशांच्या 25
मीटर एअर पिस्तूल स्पर्ध्येत गुरूपितने सुवर्ण, विजयकुमारने ब्रासपदकाची कमाई केली. सांघिक स्पर्ध्येत अक्षयअष्टपुत्रेंच्या सहभागाने भारताला सुवर्ण पदकाची कमाई करता आली. महिला फुटबॉल संघाने नेपाळचा
4-0 असा एकतर्फी पराभव करून सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत कमलादेवी हीने 2 तर बालादेवी, आशलता देवी यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले. पुरूष संघाला नेपाळकडून
1-2 असा पराभव पत्करावा लागला.
क्रीडाविषयक वातावरण निर्माण होण्यासाठी विविध स्पर्धांची अवशकता असते. पुर्वाचलातीन स्पर्ध्येच्या आयोजनामुळे येथील क्रीडानैपुण्यास प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही.
शंकर शहाणे
क्रीडाशिक्षक
सरस्वती-धन्वंतरी मा. शाळा, नांदखेडा.
मो. 9421387144
Comments
Post a Comment