100 मीटरची जलदगतीची धाव


100  मीटरची जलदगतीची धाव                                                                       
      विविध क्षेत्रात भरतीची प्रकीया सुरू होताच मैदाने गजबजु लागतात. येरवी तुरळीक जाणवणारी गर्दी आता यात्रेची स्वरूप घेवू लागते. वेळीच युवावर्गाला जाग येतेय ही आपली जेमेची बाजू आहे. चालणे, धावणे, उड्याघेणे, गोळाफीची क्रीयाकरणे तसेच शरीराच्या विविध हालचाली करतअसतांना युवा ब्रिगेड दिसते. भविष्यामुळेचका होईना आपल्या सुदृढ शरीराची जाणिवझाली ही आनंदाची बाब आहे. भरतीसाठी निर्णायक ठरणारी जलद गतीची धाव घेतांना घ्यावयाची काळजी तथा त्यासाठीचे पुरक व्यायाम हे ही तेवढेच महत्वाचे आहेत. जलद धाव पुर्ण करण्यासाठी लागते, पायात स्फोटक शक्ती आणि हृदयाचा दमखमपणा. ज्याला आपली आपेक्षित ह्दगती (THR) समजला तो विनाअपघात उत्तमप्रकारे धावण्याचा सराव करू शकेल. सर्वसाधारणपणे आपल्या ह्दयाची गती ही कमाल गतीच्या 60-80 टक्के या प्रमाणात असावी. दुसरी तेवढीच महत्वाची बाब म्हणजे शरीराच्या करावयाच्या उत्तेजक हालचाली आणि पुरक व्यायाम. शरीराला अचानक करावी लागणारी अतिउच्चतम कृती आणि त्यासाठी खर्च होणारी उर्जा याचा समन्वयही राखता आला पाहिजे.
जलदधावेची ऐतिहासीक पार्श्वभुमी : धावणे हा प्राण्यांचा नैर्सगिक गुण आहे. हि क्रीया मैदानी उपक्रमात मोडते. लघुअंतराच्या शर्यतीमध्ये 100, 200 आणि 400 मीटर येवढे अंतर धावावयाचे असते. 1896 च्या पहिल्या ॲथेन्स स्पर्धामधुन धावण्यांच्या शर्यतींना सुरूवात झाली. 200 आणि 400 मीटरच्या शर्यतीचा समावेश हा अनुक्रमे 1900 पॅरिस, 1896 च्या ॲथेन्स ऑलिंम्पिक मधुन करण्यात आला. आजतलग ह्यसा स्पर्धा सलग सुरू आहेत. जैमेकाचा उसेन बोल्ट हा पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव ठरला आहे. ह्या शर्यतींना ‘भरधाव किंवा वेगवान’ (SPRINT) असेही म्हणतात.
            लघूअंतराची शर्यत उत्तमप्रकारे पुर्ण करण्यासाठी धावपटुला महत्वाचे असणारे शारीरिक क्षमतेचे घटक म्हणजे वेग आणि दम. वेग ह्या घटकात ॲक्सीलरेशन, म्हणजेच वेगात करावयाची धावेची सुरूवात, सातत्य आणि शेवट. दम ह्या घटकात पायांच्या स्नायूंची क्षमता आणि दीर्घ श्वसनाची फुप्पुसांची क्षमता अत्यंत महत्वाची ठरते. जलद धावकाने शर्यती पुर्वी पुरक व्यायाम-प्रकार आणि उत्तेजक हालचाली केल्याच पाहिजे. या व्यायाम प्रकारात कदमताल, दौडक कदमताल, उलट धावणे, बैठका, अर्धबैठका, डाव्या तथा उजव्या पायावर जलद लंगडी, पाठीवर झोपून सायकलींग, बेंडूक उड्या, वाळूत धावण्याचा सराव दिर्घ श्वसनासाठी एका दमात फुगे फुगवणे, प्रणयामाचे काही प्रकार यांचा समावेश होतो. कंबर, मांड्या आणि पोटऱ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी सिट-अप्स, बेंन्ट नी सिट-अप्स, कर्ल-अप्स आणि वॉल सिट इ. पुरकव्यायाम करावेत. लघूअंतराच्या शर्यतीत स्पर्धकास एकदम वेगाने धावावे लागते त्यासाठी शटल रन, 50 मीटर डॅश रन, ऑन युवर मार्क्स ॲन्ड रन (ठोकळ्यात पाय रोवून बसणे, इशाऱ्यावर झटक्यात धावणे) ह्या प्रकारच्या सराव क्रीया कराव्यात.
लघुअंतर धावण्याच्या शर्यतीचे टप्पे : ह्या शर्यतीत सुरूवात, अंतर धावणे आणि शेवटचा टप्पा (फिनिश) या क्रीयांचा समावेश होतो. सुरूवात : सुरूवात ही क्लॅपर/पिस्तुच्या फैरी झाडून केली जाते. 1) स्पर्धकास सज्ज व्हा (ऑन युवर मार्क) ह्या आदेशावर धावकाणे आपल्या धावण मार्गामध्ये आरंभरेषेजवळ तिवईसारखी बोटे ठेवून समोर झोक ठेवत ठोकळ्यांना रेटून बसावे. 2) स्थिर व्हा (सेट) इशाऱ्यावर कंबर उचलून ओणवे उभे राहावे. शरीराचा भार हा बोटांवर देवन त्याचा स्पिंगसारखा उपयोग करावा. ह्या स्थितीत एकाग्र राहून इशऱ्याकडे कान ठेवावे. 3) पळा (गो, फायर) ठोकळ्यांना मागे रेटत झटक्यात शरीर पुढे झोकून द्यावे. हात कोपऱ्यात वाकवून हातांची वेगात हालचाल करावी आणि सुरूवातीचे 10-15 पावलांचे अंतर एकादमात कापावे.
अंतर धावणे : सुरवातीच्या 10 - 15 पावलांच्या पार केल्यानंतर पुढचे अंतरही वेगानेच कापण्याचा प्रयत्न करावा. शरीर थोडे पुढे झुकलेले असावे त्यामुळे गुरूत्वमध्य हा पुढे राहातो. जमिनीला मागे रेटत चवड्यांवर धावावे. हातांच्या हालचालीला लय आणि वेग असावा परंतु ते थोडे ढिले असावेत.
शेवटचा टप्पा (फिनिश) : शर्यतीच्या शेवटच्या टप्यात बळ एकवटून जलद धावावे शेवटचे 10 - 15 पावलांचे अंतर एका दमात पूर्ण करावे. अंतिम रेषा पार केल्यानंतरही काही पावले पळत राहून वेग कमी करत थांबावे.
      शरीरात पाण्याची झिज होत असल्याकारणाने प्रशिक्षकाच्या मार्गदर्शना नुसार पाणी, लिंबूशरबत, ओआसएस सारखे तत्सत पदार्थ घ्यावेत.
      घ्या जलदधाव यशस्वी होण्याची … आणि कवटाळा आपल्या उज्वल भविष्याला.
                                                    
शंकर जनार्दन शहाणे
सरस्वती धंन्वतरी मा. शाळा. नांदखेडा
मो. 9421387144

Comments