कब्बडीचा घुमला दम
कब्बडीचा घुमला दम…
अहमदाबादेत अक्टोंबर मध्ये वल्डकप कबड्डी स्पर्धा
संपन्न झाली. तीसऱ्यांदा भारताने ह्या चषकास गवसणी घातली. कबड्डी खेळात दम आणि शारीरिक
हालचाल अशी दोन्हीची सांगड घातलेली आहे. शिवाय कबड्डी हा स्पर्शखेळ (Body concat
game) आहे.
इतिहास :
भारतात कबड्डीला प्राचीन पर्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशात
पुर्वी कबड्डी हु..तु..तू.. ह्या नावाने खेळलाजात असे. तामिळनाडूत बाडी… बाडी… व बंगाल
मध्ये चिडू… गूडू… ह्या नावाने देखील कबड्डी खेळत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघात
कबड्डी खेळलाजात नसला तरी, भारतात मात्र ह्या खेळाला विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे.
भारतीय ऑलिंम्पिक महासंघाने कबड्डीस इ.स. 1958 पुर्वीच मान्यता दिलेली आहे. भारतभरात
कबड्डी विविध शाळा, महाविद्यालये आणि क्लब मधून आवडीने खेळला जातो. महाराष्ट्रात कबड्डी
तळागळात रूजवण्याचे श्रेय कबड्डी महर्शि बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांना जाते. 15 जुलै
हा त्यांचा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.
सर्वसाधारण नियम : कब्बडी हा सांघीक क्रीडा प्रकार आहे. संघात 12 खेळाडू असतात. प्रत्यक्षात
सामन्यात सातच खेळाडू खेळतात. पाच खेळाडू हे राखीव असतात. पुरूषांसाठी सामन्याची वेळ
ही 20 मिनीटे, तर महिलांसाठीची वेळ ही पंधरा मिनीटांचे दोन हाफ अशी असते. सामना बरोबरीत
सुटल्यास परत पाच-पाच मिनीटाचे दोन डाव खेळवले जातात. सामन्याची सुरूवात नानेफेक करून
होते. विजयी संघाला अंगण किंवा चढाई निवडता येते. चढाई करणाऱ्या खेळाडूने कब्बडी हा
उच्चार स्पष्टपणे आणि सलग केला पाहिजे. त्याने मध्य रेषा ओलांडण्यापर्वी दम घालण्यास
सूरूवात करावी. सामन्या दरम्यान कोणत्याही खेळाडूंनी मैदानाबाहेरील जमिनीस स्पर्श करू
नये. चढाई करणारा खेळाडू आपल्या आंगणात गेल्यास अथवा बाद झाल्यास प्रतिपक्षाने पाच
सेकंदात खेळाडूस चढाईसाठी पाठवावे. चढाई पूर्ण होईपर्यत जो संघ लोन करेल, त्या संघास
दोन गुण प्रदान करण्यात येतात. लोन नंतर प्रतिपक्षाचे खेळाडू हे दहा सेकंदात मैदानात
परत आले पाहिजे, अन्यथा एक तांत्रिक गुण दिला जातो. असे करूनही संघ जर मैदानात उपस्थित
होत नसेल तर पंच प्रति पाच सेकंद एक प्रमाणे सामन्याची वेळ संपे पर्यत एक-एक गुण देत
राहीतील आणि सामन्याचा निर्णय लावला जाईल.
विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा : पहिली आशियाई कब्बडी स्पर्धा इ.स. 1980 साली संपन्न झाली. ह्या
स्पर्ध्येत भारत विजेता, तर बांगलादेश उपविजेता ठरला होता. भारतात जयपुर येथे इ.स.
1985 साली झालेल्या आशियाई स्पर्ध्येत भारत विजेता ठरला होता. इ.स. 1990 च्या बीजींग
येथील एशियन गेम्स मधुन कब्बडी ह्या खेहाचा प्रथमच समावेश केला. येथे भारतासही चिन,
जपान, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशीया, श्रीलंका हे देश सहभागी झाले होते. येथेही भारत
विजेता ठरला. इ.स. 1994 हिरोशिमा, इ.स. 1998 बँकॉक, इ.स. 2002 बुसान, इ.स 2006 दोहा,
इ.स. 2010 ला ग्वांग्झू आणि जानेवारी 2016 ला दोहा येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये
भारतीय संघ सलग विजेता ठरला आहे. ही गौरवास्पद बाब आहे.
शालेय कबड्डी स्पर्धा : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या वतीने प्रत्येक जिल्हात,
जिल्हा क्रीडा अधिकारी मार्फत कबड्डीच्या विविध गटाच्या स्पर्धा घेतल्या जातात.
14, 17 व 19 वर्षे आतील मुले-मुली आणि महिलांसाठी ह्या स्पर्धा संपन्न होत असतात.
पुरस्कार विजेते : अर्जुन पुरस्कार – सदानंद शेट्ये, शांताराम जाधव, पंकज शिरसाठ,
अशोक शिंदे, श्रीराम भावसार, शकुंतला खटावकर, अधिलाषा म्हात्रे. कब्बडी महर्शि शंकरराव
ऊर्फ बुवा साळवी यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कबड्डी खेळ शृंगारीत होवून नविन नियमात मॅटवर
खेळला जात आहे. भारतात उपजलेल्या अस्सल मराठी रांगडया खेळाने घेतलेली उभारी पाहाता
ऑलिंम्पिक सारख्या स्पर्ध्येत कबड्डी हा खेळला जावा हीच सर्वसामान्य क्रीडाप्रेमियांची
ईच्छा.
शंकर शहाणे
क्रीडा शिक्षक / संघटक
सरस्वती धन्वंतरी मा. शाळा, नांदखेडा
मो. 9421387144
Comments
Post a Comment