हेप्टॅथलॉन ( सप्तक स्पर्धा )
हेप्टॅथलॉन ( सप्तक
स्पर्धा )
एकत्रित
मैदानी स्पर्धा मध्ये विविध चढाओढीचा समावेश होतो. ऑलिंम्पिक स्पर्धामध्ये
हेप्टॅथलॉन सारख्या स्पर्धाचा समावेश झालेला आहे. अशा स्पर्धामधून खेळांडूचा
मैदानी खेळात खरा कस लागतो. महिला व मुलींसाठी असणाऱ्या ह्या स्पर्धा दोन दिवस
चालतात.
हेप्टॅथलॉन स्पर्ध्येतील समावीष्ट मैदानी प्रकार : 100 मीटर्स हर्डल्स, उंच उडी, गोळाफेक, 200 मीटर धावणे, लांब उडी,
भालाफेक आणि 800 मीटर धावणे. अनुक्रमे पहिल्या चार स्पर्धा ह्या पहिल्या दिवशी तर
उर्वरीत तीन प्रकार हे दुसऱ्या दिवशी घेण्यात येतात.
स्पर्ध्येचे सर्वसाधारण नियम :
आंतरराष्ट्रीय असोशिएशन ऑफ ॲथलेटिक्स
फेडरेशनने ( आय ए ए एफ )
ठरवून दिलेल्या नियमानुसार स्पर्धा संपन्न होत असतात. स्पर्ध्येची एक बाब संपल्या
नंतर 30 मिनीटांनी दुसरी बाब सुरु होते. पहिल्या व दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धा सुरु
करते वेळेस पहिल्या दिवसाची शेवटची व दुसऱ्या दिवसातील पहिली स्पर्धा साधारणपणे 10
तासाच्या अंतराने सुरु होते. धावण्याच्या शर्यतीसाठी हिट पाडण्यात येतात. ह्या
शर्यतीत 3 पेक्षा कमी खेळाडू असू नयेत. धावण्यात स्पर्धकाने दोनवेळा चुकीची
सुरुवात केल्यास त्यास बाद ठरवीण्यात येते. उड्या आणि फेकीच्या स्पर्धामध्ये भाग
घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला तीन संध्या देण्यात येतात. स्पर्धकाने सातही
स्पर्धापैकी एकाही स्पर्ध्येत भाग घेतला नाही, तर त्यास पुढील स्पर्धा खेळता येत
नाही. त्या स्पर्धकाने सप्तक स्पर्धा सोडली असे समजण्यात येते.
गुणांकण : हेप्टॅथलॉन क्रीडा प्रकाराच्या गुणांकण पध्दत डॉ. कार्ल उलबरीच ह्या गणितीय तज्ञाने शोधली. धावणे, उड्यामारणे आणि फेकणे या प्रकारात
पात्रता नुसार 1000, 900, 800, 700 प्रमाणात गुणदान करण्यात येत. प्रथम
क्रमांकासाठी खेळांडूमध्ये समान गुण झाल्यास, ज्याने दुसऱ्या खेळाडूपेक्षा जास्त
क्रीडाप्रकारात अधिक गुण मिळवले आहेत तो प्रथम ठरवतात. यातही बरोबरी झाल्यास
स्पर्धकास सात बाबीपैकी कोणत्याही एका प्रकारात सर्वात अधिक गुण पाहून क्रमांक
ठरवण्यात येतो.
ऑलिम्पिक स्पर्धामध्ये समावेश : ऑलिम्पिक
स्पर्धामध्ये महिलांसाठी इ.स. 1984 लाँस अँजिलिस् अमेरिका,
पासून सप्तक शर्यत सुरु करण्यात आली. अमेरिका, रशिया, ग्रीस बेल्जीअम जर्मनी
सारख्या राष्ट्रांच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावून सप्तक स्पर्धामध्ये आपले
वचर्स्व सिध्द केले. 7291 गुणासह अमेरिकेच्या जॅकले जॉयनेर-केरसी ह्या खेळाडूने
प्राप्त केलेला उच्चांक कोणीही मोडू शकले नाही.
भारतीय सप्तक खेळाडू : सोमा बिसवास , प्रेमिला गणपती, जे जे शोभा, सुमिथासींग रॉय, इत्यादी आंतरराष्ट्रीय खेळाडूनी ऑलिम्पिक स्पर्ध्ये भारताचे
प्रतिनीधीत्व केले आहे.
अतिशच कठोर परीश्रमाचा
सप्तक क्रीडाप्रकार असल्याने, सातत्य – मेहनत – व जीद्द ह्या शिवाय ऑलिम्पिक
सारख्या मानाच्या स्पर्ध्येत पदक, सहज शक्य नाही असे म्हणावे लागेल...
शंकर शहाणे
क्रीडाशिक्षक
सरस्वती-धन्वंतरी मा. शाळा, नांदखेडा.
मो. 9421387144
Comments
Post a Comment