माँटेक्सबॉल क्रिकेट


क्रिकेटचा पर्यायी खेळ, माँटेक्सबॉल क्रिकेट..
     क्रिकेटचा आनंद सर्वानाच घ्यावसा वाटतो पण ग्रामिणभागातील अर्थकारणामुळे लेदरबॉल क्रिकेट सर्वस्तरापर्यत पोहचू शकत नाही. पर्याय म्हणुन रबरी किंवा टेनिस बॉलने क्रिकेटचा आनंद ग्रामिंण भागातील तरूण घेतांना अढळून येतात. अशाच रबरी बॉलच्या सरावातुन माँटेक्सबॉल क्रिकेटचा उगम झाला.
इतिहास : क्रिकेटला पर्यायी खेळ म्हणून मॉटेक्सबॉल क्रिकेटची  सुरूवात महाराष्ट्रातील गोंदीया येथील संघटक श्री ढोलीचंद मेश्राम महासचिव मॉटेक्सबॉल असोशीएशन ऑफ महाराष्ट्र यांनी केली. मराठवाड्यात, परभणीच्या हुसैनखॉ पठाण यांच्या नेत्रत्वात सर्व जिल्हात मॉटेक्सबॉलचा प्रचार होत आहे. मॉटेक्सबॉलच्या पाच राष्ट्रीय स्पर्धामध्ये परभणीने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. महाराष्ट्रासह, देशाच्या इतर राज्यातही हया खेळाचा प्रचार व प्रसाराने वेग धरला आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, भुतान, बॅकॉक, श्रीलंका इत्यादी देशात मॉटेक्सबॉल लोकप्रिय आहे.

खेळाचे मैदान पिच : आयाताकृती असणाऱ्या ह्या मैदानाची लांबी 18 ते 20 मीटर आणि 2.69 मीटर रुंद असते. बॉलींग / बॉटिग क्रीज हे 4 फुट 6 इंच असते. 25.46 मीटर त्रिजेचे वर्तुळात विकेट आखलेली असते. तीन स्टंप मधील अंतर हे 9 इंच असते. विकेटची उंची ही 28 इंच असते.
संघ : एकुण 14 खेळाडूंचा संघ असतो, प्रत्यक्षात मात्र 11 खेळाडू खेळतात. 3 खेळाडू राखीव असतात.
वयोगट : राष्ट्रीय मॉन्टेक्सबॉल क्रिकेट महासंघाच्या वतीने विविध गटाच्या स्पर्धा भारतभरात घेतल्या जातात. 12 वर्षे आतील मुला, मुलींसाठी सब-ज्युनिअर, 14 वर्षे आतील खेळांडूसाठी कॅडेट, 17 वर्षे आतील खेळांडूसाठी ज्युनिअर आणि 17 वर्षे वरील सर्व पुरुष व महिला अशी वर्गवारी करण्यात आलेली असते.
बॉल : सर्वसाधारणपणे बॉलचे वजन हे 120 ग्राम पेक्षा जास्त नसावे. त्याचा परीघ हा 21 ते 23 सेमी एवढा असावा.
बॅट : चार इंच रूंद असणाऱ्या बॅटची लांबी ही 38 इंच पर्यत असू शकते. सर्व खेळाचे साहीत्य हे नॅश्‍नल माँटेक्सबॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यते असणे गरजेचे असते.
सर्वसाधारण नियम : नियमीत क्रिकेटच्या नियमांसारखे मॉन्टेक्सबॉल क्रिकेटचे नियम आहेत, बाद होणे -  बोल्ड आउट, कॅच आउट, रन आउट, हिट आउट, स्टंप आउट, बॉल हाताळणे इत्यादी. अतीरीक्त धावा – वाइड बॉल, नोबॉल फ्री हिट बाय, लग बाय, ओव्हर थ्रो इत्यादी.
कमी खर्चीक असल्याने मॉन्टेक्सबॉल क्रिकेटी आवड ग्रामिण तथा छोट्या शहरात वाढत आहे.
                                     
                                        शंकर शहाणे
                                          क्रीडा शिक्षक / संघटक
                                     सरस्वती धन्वंतरी मा. वि. नांदखेडा
                                     मो. ९४२१३८७१४४


Comments

Popular posts from this blog

100 मीटरची जलदगतीची धाव

जलक्रीडा.. वाटरपोलो

साउथ एशियन गेम्स