टेनिस
गेम ऑफ ग्रँड स्लॅम… टेनिस 1
भारतावर
इंग्रजांनी शेकडो वर्ष राज्य केले, इंग्रज भारतातुन गेले, ते मागे त्यांच्या क्रीडा
वारसा ठेवून. इंग्रजांची खेळावीषयी जागरुकता व प्रेम सर्वधुत आहे. त्यानी शोधलेल्या
क्रिकेट, टेनिस सारख्या खेळांमध्ये भारतीय लगान टिमने इंग्रजांना केंव्हाच मागे टाकले
आहे. सानिया मिर्झाची चाललेली घोडदौड नक्कीच भारतीय क्रीडाप्रेमिंयांसाठी प्रेरणादायी
आहे. रॅकेट स्पोट्स मध्ये लॉन टेनिस हा
लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. ग्रँड स्लॅम
हा शब्द टेनिस मध्ये प्रचलीत करण्याचे श्रेय न्यूयॉर्क टाइम्सचे क्रीडा समिक्षक एलिसन
डेंजिंग यांना जाते. आँस्टेलियन, फ्रेंच, विंम्बल्डन आणि अमेरिकन विजेत्यास ग्रँड स्लॅम
विजेता म्हटले जाते.
इतिहास : इंग्लड
मध्ये राणी व्हिक्टोरीयांच्या काळात हा खेळ मासळी आकाराच्या बांबूच्या फळीने खेळला
जात असे. इ. स. 1873 मध्ये इंग्लडचे एक मेजर डब्लू. सी. विंगफिल्ड यांनी टेनिसच्या
प्रचारार्थ कार्य केले. इ. स. 1877 ला टेनिसची विम्बल्डन स्पर्धा सुरू झाली. 12 व्या
शतकात टेनिस सद्श खेळ हा फ्रांन्समध्ये सुद्धा तळहाताने खेळलाजात असे. फ्रॉन्सचे पाचवे
राजे चाल्स यांनी टेनिसचे कोर्ट उभारल्याचे पुरावे आढळून आले आहेत. फ्रॉन्स मधील “जेऊ
दे पाऊ मे” येथील लूईस एक्स ह्यानी टेनिस ह्या खेळाची सुरूवात केली.
टेनिस कोर्ट : टेनिसचे मैदान हे आयाताकृती असुन ते गवताळ, लालमाती, (क्ले कोर्ट),
सिंन्थेटीक पासुन बनवलेले असते. एकेरी खेळात 78 फूट (23.77 मी) लांब आणि 27 फूट
(8.23 मी) रुंद असते. दुहेरीत मैदानची रुदी ही 36 फूट म्हणजे 10.97 मी असते. कोर्टच्या
बाहेर 120*60 फूटाची मोकळी जागा असावी लागते.
जाळे : मैदानाच्या
मध्यभागी 3 फूट उंचीवर जाळे बसवलेल असते त्याची पोलकडे उंची 3.6 इंच असते. जाळीच्या
वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाची टेप बसवलेली असते.
रॅकेट : दांडाअसलेली
अंडाकृती रॅकेट असून ती नायलॉनच्या जाळीने विनलली असते. टेनिस रॅकेट ही लॅमिनेटेड वूड,
कार्बन, ग्राफाईड, सिरॅकिक्स अथवा टिआनियमपासून बनवलेली असते.
बॉल : पांढऱ्या
किंवा पिवळ्या रंगाचा टेनिस बॉल असून त्याचा व्यास 2.50 ते 2.1/8 इंच असतो. त्याचे
वजन 2 ते 2 1/6 औसमध्ये असते. चेंडू हा 100 इंचाच्या उंचीवरून सोडल्यास 53 ते 58 इंच
उसळी मारून वर गेला पाहिले.
स्कोरींग : टेनिस ह्या खेळामध्ये अंकाची गणना गेम आणि सेट मध्ये करण्यात येते.
ह्यात 0 ला लव्ह, 1ला 15, 2ला 30, आणि 3 गुणांना 40 असे संबोधले जाते 40- 40 झाल्यास
ड्यूस शब्द वापरला जातो. महिलांसाठी तीन सेट तर पुरूषांसाठी पाच सेट घेतले जातात.
2
ग्रँड स्लॅम आणि विविध स्पर्धा : टेनिसच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन,
विंम्बल्डन आणि यूएस ओपन हे चार ग्रँड स्लॅम स्पर्धा भरवल्या जातात. डेव्हिस कप, फेड
कप आणि होपमन कप सारख्या स्पर्धा ही संपन्न होतात. ऑलिंम्पिक स्पध्येमध्ये टेनिस सातत्याने
खेळला जातो.
टेनिसच्या
स्पर्धा हया एकेरी, दुहेरी तथा मिश्र दुहेरीत खेळवल्या जातात. संघटनेच्या स्तरावर विविध
गटाच्या स्पर्धा भरवल्या जातात. शालेय स्पर्धामध्ये 14, 17, आणि 19 वर्ष वयोगट तथा
महिलांच्या स्पर्धा संपन्न होतात.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू : शशी मेनन, नंदन बाळ, गौरव नाटेकर, करण रस्तोगी, इ. व्ही बॉब, पुरव
राज, जिम्मी मेहता, आसिफ इस्माइल, संदिप किर्तने अर्जुन कढे, लिअंडर पेस, महेश भुपती.
महिलांमध्ये राधिका तुळपुळे, ऐश्वर्या श्रीवास्तव, जान्हवी पारेख, मनिषा मल्होत्रा,
इशा लखानी, सोनल फडके, सानिया मिर्झा अणि प्रार्थना ठोंबरे इ.
आंतराष्ट्रीय स्तरावर आय. टी. फ, ए. टी. पी संघटना
कार्यन्वत आहेत. भारतात आखिलभारतीय टेनिस संघटना तर महाराष्ट्रात 1932 पासुन महाराष्ट्रराज्य
लॉन टेनिस संघटना प्रचार त प्रसाराचे कार्य करीत आहे.
मुलींना देवूया रॅकेट आणि बनवूया टेनिस स्टार…
शंकर
शहाणे
क्रीडाशिक्षक / संघटक
सरस्वती धन्वंतरी मा. शाळा, नांदखेडा
Comments
Post a Comment