चॉकबॉल
चॉकबॉल
साहित्यासह खेळल्या जाणऱ्या क्रीडाप्रकारात चॉकबॉल खेळाचा समावेश
होतो. प्रथमदर्शनी हॅन्डबॉलखेळासारखा वाटणारा हा खेळ तितकाच भिन्न आणि मनोरंजकसुध्दा
आहे. बॉलघेवून प्रतिस्पर्धावर आक्रमण करणे. त्याच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या बाजरूपी
जाळीवर बॉल अपटवून गुण मिळवणे अशा रंजक क्रियामुळे चॉकबॉल खेळाची लोकप्रियता अधिकाधिक
वाढत आहे. चॉकबॉल हा वेगवान खेळ आहे.
इतिहास :
चॉकबॉल ह्या खेळाची सुरूवात इ. स. 1938 मध्ये, अमेरिकेत झाली. जिनेव्हा येथील स्विर्झलॅन्ड
शारीरिक शिक्षण महाविज्ञालयातील यूलीन पुरस्कार विजेते प्रोफेसर डॉ. हरमन ब्रॅड किई
यांनी चॉकबॉल ह्या खेळाची सुरुवात केली. शारीरिक शिक्षण विषयक आपल्या संशोधनात्मक पुस्तकात
त्यांनी (Frm Physical education to sports biology) चॉकबॉल ह्या खेळाचा उल्लेश केलेला
आहे. डॉ. हरमनचे हे पुस्तक संपुर्ण जगात लोकप्रिय झाले होते. चाकबॉल ह्या खेळाला युरोपातही
लोकप्रियता लाभलेली आहे. विविध 40 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतभरातुन 24 राज्यात
आणि महाराष्टील 32 जिल्हात चॉकबॉल खेळला जातो. जिल्हा चॉकबॉल असोशिएशनच्या माध्यमातुन
खेळच्या प्रचार, प्रसाराचे कार्य केले जाते. चॉकबॉल खेळादरम्यान गुण संपादीत करतांना
बॉलला जाळीवर अपटावे लागते त्यातच एक विशिष्ट प्रकाराचा आवज येतो, ह्यावरून या खेळाचे
नांव चॉकबॉल असे पडले आहे.
मैदानाचे मोजमाप : चॉकबॉल खेळाचे मैदान हे आयाताकृती असून, त्यात बाजेसारखी जाळी लावलेली
असते. मैदान हे 24 ते 30 मी. लांब आणि 15 ते 20 मी. रुंद असते. मैदानाचे समान दोन भाग
केलेले असतात. मैदानाच्या सर्वरेषा ह्या पाच सें. मी. जाडीच्या असतात.
जाळी : आंतरराष्ट्रीय
चॉकबॉल फेडरेशन यांनी मानांकीत केल्या प्रमाणात जाळीचे मोजमापे असतात. 1 मीटरच्या चौरसात
असणाऱ्या फ्रेमवर दोरीने विणकाम केलेले असते. ह्या फ्रेमला तश्याच चौरसाकृती टेकुने मैदानात 55 अंशात
बसवले जाते. ह्या जाळीवर खेळाडू बॉलला अपटवून गुण संपादीत करत असतो. सामन्या साठी वेळ
निश्चीत केलेली असते.
बॉल : वरीष्ठ
गटाच्या पुरूष व महिला खेळाडूंसाठी बॉलची मापे ही 58 ते 60 सेमी. तर ज्यूनिअर खेळाडूसाठी
45 ते 56 सेमी. असतात. बॉलचे वजन 325 ते 400 ग्राम असते.
खेळाडू : चॉकबॉल
ह्या खेळातील संघात एकुण 10 खेळाडू असतात, प्रत्यक्ष मैदानात 7 खेळाडू खेळतात. 3 खेळाडू
राखीव असतात. खेळांडूची अदलाबदल करतांना खेळ थांबवला जात नाही, चालू सामन्या दरम्यान
मैदानाच्या मध्य रेषेवर दोन्हही खेळाडू येतात, आत खेळणारा खेळाडू बाहेर आणि बाहेरील
राखीव खेळाडू मैदानात पंचाच्या परवानगीने प्रवेश करतो.
हॅन्डबॉल सदृश ह्या खेळात वापरल्याजाणाऱ्या बाजेमुळे
रंजकता आलेली आहे.
शंकर शहाणे
क्रीडाशिक्षक
सरस्वती धंन्वतरी मा. शाळा, नांदखेडा
मो. 9421387144
Comments
Post a Comment