ध्यानचंदांचे आले ध्यान..
ध्यानचंदांचे आले ध्यान..
आपण
सर्व भारतवासी तेवीसाव्या क्रीडादिनाला सामारो जात आहोत. पर्यावरणदिन, बालदिन, योगदिन,
क्रीडादिन.... फक्त साजरे करून आपण मोकळे होतो. एका दिवसाच्या ह्या उत्साहामध्ये
आपण आनंद शोधत असतो. त्या दिवसा पुरता तो आपल्याला मिळतोही. पण पुढे काय? तीचती सुरुवात. आपल्यापैकी काही संकल्पही करतात, आणि असे संकल्प विरघळतांनाही
आपण पाहातो. आपणाला खरी आठ
वण येते अडचणीच्या वेळी आळस, कंटाळवाणेपण, आणि आजर अशा वेळी आपण क्रीडा, खेळ आणि योग यांचे गुणगान गात आसतो.
वण येते अडचणीच्या वेळी आळस, कंटाळवाणेपण, आणि आजर अशा वेळी आपण क्रीडा, खेळ आणि योग यांचे गुणगान गात आसतो.
क्रीडादिनावरून
आठवण होते ती “मेजर ध्यानचंदाची.” मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस आपण
क्रीडदिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद आपल्या खरेच लक्षात राहीले आहेत काय? जर असतील तर त्यांचा भारतरत्नाचा आग्रह मोजकेच
क्रीडाप्रेमी धरतांना का दिसतात ? गेल्या वर्षी कुमार गटाच्या भारतीय युवा हॉकीपट्टूनी तब्बल पंधरा वर्षा नंतर विजयी चषक उंचावला. भारत हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदांचा देश आहे हे जगाला आठवुन दिले.
ध्यानचंदांच्या नावावर हॉकीतील अनेक पराक्रम तर आहेतच शिवाय मायदेशप्रेमाचे किस्सेही आहेत. आंतररारष्ट्रीय
स्तरावर भारतीय हॉकी संघ संघर्ष करत आहे. ऑलिंम्पिंक
तथा जागतीक स्पर्ध्येत भारतीय संघांची पिछेहाट होतचालली आहे त्यातच हा जागतीक विजय मेजर ध्यानचंदांचे ध्यान करून देणारा ठरणार आहे.
मेजर
ध्यानचंदा विषयी :
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 साली उत्तरप्रदेशात अलाहाबाद येथे झाला. येथेच त्यानी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण
केले.
ध्यानचंद इ.स. 1922 साली
सेनादलात शिपाईपदावर रूजु झाले. इ.स. 1922 सेवेत रूजुझाल्या पासून त्यानी हॉकी खेळाची सुरूवात केली. इ.स. 1923 रोजी ते सहभागी असलेल्या सेनादलाच्या संघाने राष्ट्रीय स्पर्ध्येत विजय प्राप्त
केला. 16
फेब्रुवारी 1928 साली ध्यानचंदांची
ऑलिंम्पिंक स्पर्ध्येत सहभागी होणाऱ्या
भारतीय संघात निवङ झाली. इ.स. 1934 साली
प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्या
कडे आले. आणि ह्या
संघाने सुवर्णपदकासह
विजय प्राप्त केला. इ.स. 1947 साली पश्चिम आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्वही त्यांनी केले. इ.स. 1956 साली ध्यानचंदाच्या संघाने श्रीलंका दौरा केला. सेनादलाकडून ध्यानचंदाना
मेजरपद बहार करण्यात आले. 3 डिसेंबर 1979 रोजी
हा सोनेरी तारा अनंतात विलीन झाला.
भारत
सरकारने डिसेंबर 1994 पासुन ध्यानचंदांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून घोषित केला. 29 ऑगष्ट 1995 रोजी
देशाच्या
प्रथम क्रीडादिनी दिल्लीतील
नॅशनल स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले. 5 डिसेंबर 1980 रोजी
पोस्ट खात्याद्वारे मेजर ध्यानचंदांची प्रतिमा आलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. इ.स. 2005 पासून मेजर ध्यानचंदांच्या नावाने क्रीडाक्षेत्रातील महत्वाचा जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला.
मेजर
ध्यानचंदाची ऑलिम्पिक
मधील विलक्षण
कामगीरी : इ.स. 1928 साली ॲमस्टरडम येथील ऑलिंम्पिंकमध्ये भारताने हॉकीत पहिले सुवर्ण पदक जिंकले. 1932 साली लॉस एंजिलिस येथे झालेल्या ऑलिंम्पिंक मध्ये दुसरे सुवर्ण पदक प्राप्त केले. ह्या
स्पर्ध्येत 8 गोल एकट्या ध्यानचंदांचे होते हे विशेष. इ.स. 1936 च्या बर्लिन ऑलिंम्पिकमध्ये पुन्हा हाच करीष्मा दाखवत सवर्णपदकांची हॅट्ट्रीक केली. मेजर ध्यानचंदांच्या नावावर 400 गोलचा
जागतीक विक्रम आहे.
हॉकीच्या
जादुगाराच्या सामन्यातील
विलक्षण क्षण : इंग्रज अधिकाऱ्याच्या बरोबर झालेल्या एका सामन्यात मेजर ध्यानचंदयांचा हॉकीस्टिक सोबत धावणारा बॉल पाहून बॉल हॉकी स्टिकला चिकटला की काय ? त्यासाठी
हॉकी स्टिकची तपासणी करण्यात आली. एका सामन्यात
मेजर ध्यानचंदयांना गोलकरण्यात अपयश येत होते, त्यानी
गोलपोस्टच्या रंदीबाबत पंचाकडे तक्रार केली. आणि काय आच्छर्य गोलपोस्टची रंदी आतंराष्ट्रीय नियमानुसार बरोबर नसल्याची खात्री झाली. इ.स 1936 च्या बर्लिन ऑलिंम्पिकमधील सामन्यामध्ये भारताला मिळत असलेले विजय आणि मेजर घ्यानचंदाचा निखरत चाललेला खेळ पाहाता, जर्मन वृत्तपत्रांमध्ये ”दी ऑलिंम्पिक कॉम्पलेक्स नाऊ हॅजअ मॅजिक शो टू” असा
उल्लेख केला होता. हॉकीच्या जादुगाराला पाहाण्यासाठी मोठी गर्दी स्टेडीअममध्ये झाली होती. जर्मनीचे
नागरीकत्व स्वीकारण्याची गळ सुध्दा मेजर ध्यानचंदाना स्वता: हिटलरने घातली होती. हॉकीमध्ये
क्रीकेटसारख्या गोलच्यास्वरूपात धावा काढणाऱा मेजर असा उल्लेख सर डॉन ब्रॅडमन यांनी केला होता. हॉकीच्या जादुगाराची सोनेरी
आठवण आजही चकचकीत आहे.
भारताच्या
ह्या सुपुत्राला भारतरत्न बाहाल होवो…. हिच
ईश्वर चरणी प्रार्थना.
शंकर शहाणे
क्रीडा शिक्षक तथा संधटक
सरस्वती धन्वंतरी मा. शाळा,
नांदखेडा
मो.
9421387144
Comments
Post a Comment