चालणे
स्पर्धात्मक चालण्यातली, तुरुतुरु चाल.
सर्ववयोगटात करण्याजोगा एकच व्यायाम प्रकार आहे, तो म्हणजे चालणे.
सकाळचे चालणे मॉनिंग वॉक, सायंकाळचे चालणे इव्हिनिंग वाक, जेवण झाल्यावर चालणे शतपावली,
गोंडस बाळांचे चालणे, तुरुतुरु चाल, ठुमकत चाल, मांजरचाल, घोडाचाल… चालण्याचे कितीतरी
प्रकार आपण जाणतो. आबालवृध्दानां सुध्दा चालण्याचा मोह होतो. चालणे हा फक्त सर्वसाधारण
व्यायाम प्रकार नसुन स्पर्धात्मक प्रकार सुध्दा आहे.
स्पर्धात्मक चालणे : जमिनीशी स्पर्श न तुटता एकामागे एक पावले टाकीत पुढे चालण्याची
क्रिया अशा रीतीने करणे, की मानवी डोळयांनी पाहिले असता चालणाऱ्या खेळाडूंचा जमिनीशी
संपर्क कायम टिकुन राहिल. मागील पायाचा जमिनीशी स्पर्श तुटण्यापुर्वी पुढील पायाचा
जमिनीशी संपर्क झाला पाहिजे. चालतांना पाय गुडघ्यात वाकला तर तो नियमभंग ठरतो.
शर्यतीचा प्रारंभ व शेवट : शर्यतीचस प्रारंभ हा एका समांतर स्थिर रेषेवरून केला जातो. प्रारंभक
स्पर्धकांना ऑप युवर मार्क म्हणूण हवेत पिस्तुल उडवतो. स्पर्धकांची संख्या जास्त असल्यास
पाच मिनीटे पुर्व घंटा वाजवली जाते. शर्यत सुरू होतास नेमलेले पंच खेळांडूचे निरीक्षण
करत आतात, त्याच्या हातात टेनिसच्या बॅट प्रमाणे पिवळ्या रंगाची कॉशन बॅट असते बॅटवर
बेंड नी आणि शंकास्पद स्पर्श असे लिहीलेले असते. तीन सुचना नंतर स्पर्धकास बाद करण्याचा
अधीकार पंचांना असतो. स्पर्ध्येचा शेवट हा समांतर रेषेवर केला जातो. कामी वेळेत नियमात
चालुण अंतर पुर्ण करणाऱ्या स्पर्धकास क्रमांक बहाल केले जातात.
वैद्यकिय चाचणी : आयएएफ च्या नियमा प्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येमध्ये
खेळाडूंची वैद्यकिय चाचणी केली जाते. अधीकृतरीत्या
नेमुण दिलेल्या वैद्यकिय तज्ञा कडूनच गरजे नुसार अशी सेवा घेतली जाते. अतीदक्षतेच कारणास्तव
एखादया खेळाडूस वैद्यकिय तज्ञानी थांबण्याचा
आदेश दिला असल्यास त्या स्पर्धकास शर्यत सोडावी लागते.
विविध स्पर्धा : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोशिएशनच्या मान्यतेने पुरूष, महिला, मुले
व मुलींसाठी चालण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. 1) पाच कि. मी. चालणे – 16 वर्षे आतील
मुले आणि 18 वर्षे आतील मुली. 2) दहा कि. मी. चालणे - 18, 20 वर्षे आतील मुले आणि
20 वर्षे आतील मुली. 3) विस कि. मी. चालणे – पुरूष आणि महिला ह्या स्पर्ध्येत सहभागी
होवू शकतात. ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये महिला साठी 20 आणि पुरुषांसाठ
20 व 50 कि. मी. चालण्याच्या स्पर्धा होतात. फ्रान्सच्या योहान दिनीझ याने जागतीक उच्चांक
करत 3:32:33 वेळेची नोंद केले आहे.
बद्रीनाथच्या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या “मनिष रावतने” रीओ ऑलिम्पिक
मध्ये सहभाग घेवून भारताची प्रतीमा उंचावली. मनिषने 20 कि. मी. चालण्याच्या स्पर्ध्येत
तेरावा क्रमांकावर झेप घेतली. आतरराष्ट्रीय पुरुष खेळांडूमध्ये इरफान थोडी, देवेद्र
सिंग (विस कि.मी.) सुरेंद्र सिंग (तीस कि.मी.) संदिप कुमार (पन्नस कि.मी.) कि.मी. तर
महिला मध्ये खुशबिर कौर इत्यादी खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर भारतीय संघाचे नेत्रत्व
करत आहेत.
शंकर शहाणे
क्रीडाशिक्षक
सरस्वती धन्वंतरी, मा. शाळा, नांदखेडा.
मो. 9421387144
Comments
Post a Comment